विजय तेंडुलकरांचे पहिले विनोदी नाटक 'गृहस्थ' या नाटकानंतर अतिशय उद्वेगाने आयुष्यात नाटक म्हणून लिहायचे नाही असे त्यांनी पक्के ठरविले होते.
'हे तुझे पहिले नाटक लक्षात घेता बरे लिहिले आहेस, देअर ईज समथिंग इन इट!' ह्या वडील बंधू रघुनाथ तेंडुलकर यांच्या सांगण्यावरून त्यांनी या नाटकाचे पुनर्लेखन केले.
चार्टर्ड अकाऊंटंटच्या परीक्षेला बसलेल्या आपल्या खऱ्याखुऱ्या मित्रावर आधारित हे नाटक म्हणजे त्याच्यावर कोसळलेल्या एकाहून एक चित्तथरारक अशा अनंत अडचणींची कर्मकहाणी आहे.