जी. ए.च्या कथांत साकार झालेला ध्यास हा एका संमिश्र, यातनागाढ व्यक्तिमत्त्वाने घेतलेला ध्यास आहे. या ध्यासात रूढ सामाजिक जाणिवेला अवसर नाही. सामाजिक मूल्ये व संदर्भ म्हणजे एक भयावह, हास्यास्पद गुंतागुंत आहे असाच जी. ए.चा प्रकट अभिप्राय दिसतो. सामाजिकता हा नियतीच्या क्रूर खेळाचा केवळ दृश्य भाग आहे. जी. ए.चे भावसाफल्य या भयावह गुंतवळीतच आहे. ही गुंतवळ जीवघेणी ठरते. ती तिच्या निरर्थकतेमुळे. या निरर्थकतेची शापित. जहरी छाया अवघ्या मानवजातीला व्यापून दशांमुळे उरते. या कथेचे दुसरे ध्यानात येणारे वैशिष्ट्य म्हणजे कथा हलकी, विरविरीत पोताची वाटत नाही. केवळ विषय गंभीर, नाट्यमय, थरारक असल्याने ती गंभीर वाटते असे नव्हे. नाट्यात्म विषय गंभीर निवेदनशैलीत मांडणाऱ्या सर्व कथा सधनतेचा अनुभव देतातच असे नाही. जी. ए.च्या कथांची वीण साध्या सणंगासारखी नसते. रात्रंदिवस खपून एकाच ठिकाणी घातलेल्या अनेक टाक्यांनी जाड थराचा आणि वरच्या बाजूला खानदानी, टिकणारे, ऎश्वर्यसंपन्न रंग आणि आकृती जमवीत, जोडीत जसा एखादा गालीचा विणणारा मनुष्य परंपरेने हात आणि नजरेत उतरलेले कसब टाक्या टाक्यागणिक उमटवीत जातो तशीच त्यांच्या कथेची वीण बसत जात&
ThriftBooks sells millions of used books at the lowest everyday prices. We personally assess every book's quality and offer rare, out-of-print treasures. We deliver the joy of reading in recyclable packaging with free standard shipping on US orders over $15. ThriftBooks.com. Read more. Spend less.